baramati Big breaking ! सुपे येथे महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोड्याचा प्रयन्त : गोळीबारात दोन जण जखमी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : सचिन पवार
सुपे बाजार मैदानानजीक असलेल्या महालक्ष्मी ज्वलर्स दुकानात जावुन दागिणे पाहण्याचा बहाना करुन लुटण्याचा प्रकार केला.यावेळी एकच गोंधळ झाल्याने गोळीबार करुन दरोडेखोराने पळुन जाण्याच्या प्रयत्नात  गोळीबार केला. तर ग्रामस्थांना त्यातील एकाला पकडण्यात यश आले.  तर तीन जण पळुन जाण्यात यशस्वी झाले. 
         यावेळी जखमी झालेल्यामध्ये सागर दत्तात्रय चांदगुडे ( वय ३० रा. तरटेवस्ती, पानसरेवाडी ), अशोक भागुजी बोरकर ( वय ५५ रा. बोरकरवाडी ), सुशांत क्षिरसागर          ( सुपे) अशी तीघंची नावे आहेत. 
               बाजार मैदानानजीक असलेल्या सुयश सुनिल जाधव यांच्या महालक्ष्मी ज्वलर्स मध्ये दरोडेखोरांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी १५ तोळे सोने पळवण्याच्या प्रयत्नात दरोडेखोरांनी दुकानात गोळी झाडली. 
        त्यानंतर बाहेर पळुन जण्याचा प्रयत्नात असताना बाहेर उभे असलेल्या सागर चांदागुडे यांनी दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोराने गोळी झाडली असता त्याच्या जांगेवर गोळी लागली. तर दुसऱ्या दोन गोळ्या अशोक बोरकर यांच्या पोटाला चाटुन गेली. तर सुशांत क्षिरसागर यांच्या पायाला गोळी लागली. 
     त्यानंतर पोलिस नाईक दत्तात्रय धुमाळ, नाजीर रहीम शेख, राजकुमार लव्हे हे घटानस्थळी आले असता दरोडेखोरांना  पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. तर तीन जण किया या चारचाकी गाडीतुन फरार झाले. 
       यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले असुन एकावर साळुंके हॉस्पिटमध्ये उपचार चालु आहेत. 
        दरम्यान सुपे पोलिस स्टेशनमध्ये पकडलेल्या दरोडेखोराचे पवन विश्वकर्मा ( रा. नागपुर ) असे नाव असुन घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, विभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी माहिती दिली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरिक्षक सल्लीम शेख करीत आहेत.
 
            
To Top