सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

राजगुरूनगर ! कडूस गावात राज्यातील पहिला ‘गोबरधन’ प्रकल्प : वर्षाकाठी ग्रामपंचायतीला मिळणार आठ ते दहा लाखांची वीज

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुणे : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील कडूस येथे राज्यातील पहिला ‘गोबरधन’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला वीज प्राप्त होणार असून वर्षाला विजेसाठी होणाऱ्या ८ ते १० लाख रुपयांची बचत होणार आहे.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद टोणपे, माजी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, सरपंच शहनाज तुरूक, ग्रामसेवक बाळासाहेब माने आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात स्वच्छता राखण्याच्यादृष्टीने या प्रकल्पाची सुरूवात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक प्रकल्प उभारण्यात येत असून यापूर्वी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात कार्यान्वित होणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे.

प्रकल्पासाठी जिल्ह्याला केंद्र सरकारकडून ५० लाख रुपये प्राप्त झाले होते. प्रकल्प उभारण्यासाठी खेड तालुक्यातील कडूस गावाची निवड करण्यात आली. परिसरात असणाऱ्या धाब्यावरील ओला कचरा, पशुधनाचे मलमुत्र आदींचा उपयोग करून या प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. गावातील पथदिव्यांसाठी ही वीज उपयोगात येणार असल्याने ग्रामपंचायतीचा खर्च कमी होऊन इतर विकासकामांसाठी अधिक खर्च करणे शक्य होणार आहे.

वीज निर्मितीनंतर प्राप्त होणारे कंपोस्ट खताचे पॅकींग व ब्रँडींग करून स्थानिक शेतकऱ्यांना ते स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळेदेखील ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू शकेल. एकूणच परिसरातील वाया जाणाऱ्या कचऱ्यातून हा प्रकल्प चालविण्यात येणार असल्याने परिसर स्वच्छतेसाठीदेखील उपयुक्त ठरणार आहे.
---------------------
दिलीप मोहिते पाटील, आमदार-
 गावाच्या स्वच्छतेसाठी प्रकल्पाचे महत्व जनतेला आता कळले आहे. त्यामुळे त्याला ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळेल. हा राज्यातील आदर्श प्रकल्प व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
---------------------
आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी-
गोबरधन योजनेअंतर्गत राज्यात कार्यान्वित होणारा हा पहिला प्रकल्प आहे. हा प्रकल्प ग्रामपंचायतीला लाभदायक आणि ग्रामस्वच्छतेला पूरक ठरणार आहे

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6977,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : राजगुरूनगर ! कडूस गावात राज्यातील पहिला ‘गोबरधन’ प्रकल्प : वर्षाकाठी ग्रामपंचायतीला मिळणार आठ ते दहा लाखांची वीज
राजगुरूनगर ! कडूस गावात राज्यातील पहिला ‘गोबरधन’ प्रकल्प : वर्षाकाठी ग्रामपंचायतीला मिळणार आठ ते दहा लाखांची वीज
https://lh3.googleusercontent.com/-A039BvC8dEk/ZCetP6A5WOI/AAAAAAAAV3o/NLwFFEOFEUk1pmiEMHYuC7rag8_ppkVzQCNcBGAsYHQ/s1600/1680321853203828-0.png
https://lh3.googleusercontent.com/-A039BvC8dEk/ZCetP6A5WOI/AAAAAAAAV3o/NLwFFEOFEUk1pmiEMHYuC7rag8_ppkVzQCNcBGAsYHQ/s72-c/1680321853203828-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/03/blog-post_865.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/03/blog-post_865.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy