आजपासून नवीन ६ अंकी हॉलमार्क कायद्याची अंमलबजावणी होणार : जुना हॉलमार्क स्टॉक असणाऱ्या सराफ़ांना काहीसा दिलासा : किरण आळंदीकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
1 एप्रिल पासून दागिन्यांवर 6 अंकी एच.यु.आय.डी म्हणजेच युनिक आय डी क्रमांक असावा असा नवीन कायदा केंद्र सरकारने केला असून, पूर्वीची 4 अंकी हॉलमार्क पद्धत संपुष्टात येणार आहे.
1 जुलै 2021 पासून देशात हॉलमार्क कायदा सक्तीचा करण्यात आला होता यावेळी भारतीय मानक ब्युरो, बी. आय. एस. या संस्थेकडे 43153 नोंदणीकृत सराफ व्यावसायिक होते, या व्यवसायिकांकडे हॉलमार्क केलेले किती दागिणे आहेत ते त्यांनी घोषित करावेत असे बी. आय. एस. कडून परिपत्रक काढण्यात आले होते, यावेळी 16243 सरांफानी आपला स्टॉक घोषित केला होता, काल केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रक मध्ये अशा स्टॉक घोषित केलेल्या व्यवसायिकांना नवीन पद्धतीने एच. यू आय डी करण्यास आणखी 2 महिने मुदत वाढवून दिलेली असून, जुन्या पद्धतीने हॉलमार्क चे नवीन एच यु आय डी करताना दरामध्ये सवलत देण्याचे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. या मुळे काही प्रमाणात सराफ व्यवसायिकांना दिलासा मिळाला असल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले.
पूर्वी हॉलमार्क सेंटर्स मर्यादित असल्याने शहरी भागामध्ये हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असे परंतु एच. यु आय. डी. चा कायदा सक्तीचा झाल्याने उद्यापासून ग्रामीण भागात देखील सर्वत्र हॉलमार्क प्रमाणित ( 6 अंकी एच. यु. आय. डी. असलेले ) दागिणे ग्राहकांना उपलब्ध होतील.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये,शुद्ध सोने मिळावे,व्यवसायात पारदर्शकता राहावी,या उद्देशाने केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याचे स्वागत च आहे,परंतु त्यातील जाचक तरतुदीचा पुनर्वीचार होणे गरजेचे आहे.
जुन्या दागिण्याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम असून,जुने दागिणे हॉलमार्क असले किंवा नसले तरी  ते दागिणे बदलताना किंवा मोडताना त्याचे मूल्य कमी होणार नसल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले.
To Top