सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर शहरात नगरपालिकेशेजारी पिसाळलेल्या कुत्र्याने शनिवार दि.१ धुमाकूळ घातला असून या पिसाळलेल्या कुत्र्याने २ बुजुर्ग व्यक्तींवर हल्ला करून चावा घेतल्याने दोन्ही बुजुर्ग व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आहेत. जवळच असलेल्या तरुणांनी तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगीत जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
भोर शहरात कामानिमित्त उत्रोली तसेच हातनोशी येथील दोन व्यक्ती जात असताना पिसाळलेल्या कुत्र्याने मागून त्यांच्यावर हल्ला करून चावा घेतला यात या व्यक्तींच्या पायाला मोठ्या प्रमाणावर जखम झाली असून रक्तबंबाळ अवस्थेत या दोन्ही व्यक्तींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नगरपालिकेने लवकरात लवकर या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले नाही तर अनेक काही लोकांना हे पिसाळलेले कुत्रे चावा घेण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे.