सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : प्रतिनिधी
वेल्हे तालुक्यातील पाबे येथील नवनाथ उर्फ पप्पु रेणुसे यांस जमिनीच्या वादातुन व मुलाच्या मुत्युस कारणीभुत असल्याच्या संशयावरुन फायरींगसह खुन करणा-या सर्व आरोपीला पोलीसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले आहे अशी माहीती वेल्हे पोलीसांनी दिली.
याबाबत अधिक माहीती देताना पोलीसांनी सांगितले कि वेल्हे तालुक्यातील पाबे येथील नवनाथ उर्फ पप्पु नामदेव रेणुसे ( वय ३६) दिनांक ६ मार्चला १२.१० मिनिटांनी ज्ञानेश्वर उर्फ माऊली लक्ष्मण रेणुसे व अज्ञात ४ इसमांनी नवनाथ उर्फ पप्पु नामदेव रेणुसे मरळ आवाडात खरेदी केलेल्या जमिनीबाबत काहीतरी काड्या करीत आहे.असा समज करुन धारदार चाकुन व सतुराने चेह-यावर वार करुन व पिस्टलमधुन गोळया झाडुन वेल्हे येथील हॅाटेल विशाल येथे खुन केला.
याबाबत वेल्हे पोलीसांत कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल अप्पर पोलीस
अधिक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोलेपाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,स्थानिक गुन्हे शाखा पुणे
सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे,राहुल गावडे,पोलीस हवालदार सचिन घाडगे,अजित भुजबळ,राजु मोमीन,चंद्रकांत जाधव,पोलीस नाईक अमोल शेडगे,बाळासाहेब खडके,तुषार भोईटे,पोलीस कॅान्टेबल मंगेश भगत,अक्षय सुपे,वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार,पोलीस हवालदार योगेश जाधव,सुरेश कांबळे अशी विविध पथके तयार करुन तपासासाठी पाठविण्यात आली होती,नेमण्यात आलेल्या एका पथकास गोपनीय बातमीदारांकडुन आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे पुणे येथील किरकटवाडी परिसरात असल्याची माहीती मिळाली त्यानुसार माऊली उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे (वय ५६)राहणार पाबे,ता.वेल्हे ,सध्या राहणार २२५,२२६ काळभोरवाडा शुक्रवार पेठ पुणे,आकाश कुमार शेटे (वय २४) १९१ शुक्रवार पेठ पुणे,यश उर्फ प्रथमेश विनायक चित्ते (वय २२) २०६ शुक्रवार पेठ पुणे,अक्षय गणेश साळुंखे (वय २७)१९१ शुक्रवार पेठ पुणे,शुभम राजेश थोरात (वय २१) २१८ शुक्रवार पेठ पुणे,यांना पोलीसांनी अटक केली आहे,माऊली उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे या सर्वांनी मिळुन जमीनीच्या व्यवहारात मयत नवनाथ उर्फ पप्पु नामदेव रेणुसे हा हस्तक्षेप करीत आहे या कारणावरुन व माऊली रेणुसे यांचा मुलगा एक वर्षापुर्वी मयत झालेला असुन त्याच्या मुत्युस नवनाथ उर्फ पप्पु नामदेव रेणुसे हाच जबाबदार
आहे असा समज करुन घेऊन खुन करण्यात आलेला आहे असे तपासात निष्पन्न झाले आहे, गुन्हा करण्यापुर्वी माऊली उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे यांनी त्याची पत्नी कुंदा ज्ञानेश्वर रेणुसे (वय ४५) ,मुलगी पल्लवी भुषण येणपुरे (वय ३०),मुलगी गौरी अमोल उर्फ शशिकांत शिंदे (वय २७) यांनी गुन्हा करण्याचा कट तयार खुन केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असुन सर्व आरोपींना पोलीसांनी अटक केले असुन ८ मार्चला न्यायालयात हजर केले आहे.याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील करीत आहेत.