सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
इंदिरा गांधी तांत्रिक विद्यानिकेतन सोमेश्वरनगर ता. बारामती येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम ८ मार्च रोजी मी आणि माझे आरोग्य या विषयावर इंदिरा गांधी तांत्रिक विद्यानिकेतन या संस्थेमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी ठीक बारा वाजता या संस्थेच्या संचालिका सविता काकडे, रागिणी कुलकर्णी, संस्थेचे सचिव नितीन कुलकर्णी, संचालक संजय घाडगे स्मिता काकडे, सुलभा काकडे, भारती काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव नितीन कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या व्यवस्थापिका प्रियंका तांबे यांनी केले याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. तेजश्री जगताप यांनी महिलांना आरोग्य विषयी आपण कोण कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबद्दल खूप छान प्रकारे माहिती सांगितली महिलांनी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य कशाप्रकारे जपले पाहिजे व सकस आहार कोणत्या प्रकारे घेतला पाहिजे याबद्दल माहिती दिली.
महिला दिनाचे उचित्त साधून आज समर्थ लॅब सोमेश्वर नगर यांच्यातर्फे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली व त्यासाठी महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला महिलांनी आपले असणारे प्रश्न डॉक्टरांना विचारले व त्यांनी त्या प्रश्नांची निरसन केले. याप्रसंगी.उज्वला लोखंडे राणी काकडे. सारिका जगताप, प्रिती फरांदे, संदीप पांडुळे व पवार यांचे कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले. उपस्थितांमधून काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन प्रा.प्रियंका तांबे यांनी केले तर सारिका जगताप यांनी कार्यक्रमाचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव नितीन कुलकर्णी मार्गदर्शन लाभले.