बारामती ! वनांच्या वनव्याबरोबरच ...आता उन्हाचा चटका ही वाढू लागला.... ! वन्यप्राणी सैरभैर...सोमेश्वरनगर परिसरातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत...केली पाण्याची सोय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर परीसरातील तरुणांनी एकत्र येत होळी सणाचे औचित्य साधून वाघळवाडी (ता. बारामती) येथील वनक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी टाक्यात पाणी सोडले. एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन, साद संवाद स्वच्छता ग्रुप, गड किल्ले ग्रूपच्या वतीने वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी दोन टँकरद्वारे ५ हजार लिटर पाणी सोडण्यात आले. सोमवारी (दि. ६) रोजी सदस्यांच्या उपस्थितीत वाघळवाडी येथील वन विभागात पाणी सोडण्यात आले. वाघळवाडी येथे शेकडो एकरांवर वनविभागाचे क्षेत्र आहे. या ठिकाणी विविध पक्षी, चिंकारा जातीचे हरीण, ससा, तरस आदी वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे.उद्योजक सचिन सोरटे यांचे यासाठी सहकार्य लाभले. 

               वाढत्या उन्हाने नागरिकांसह पशुपक्षीही हैराण झाले असून पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. कडाक्याचा उन्हाळा असल्याने नागरीवस्तीत प्राणी पाण्याच्या शोधात येत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आणि अपघातात वन्यप्राण्यांना इजा पोहचते. यामुळे तरुणांनी राबविलेल्या उपक्रमाचे परीसरात कौतुक होत आहे. वनविभागाच्या वतीने याठिकाणी पाणी सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद देत परीसरातील तरुणांनी एकत्र येत हा सामाजिक उपक्रम राबविला. परीसरातील अनेक तरूण उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करतात. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. चौधरी, वनरक्षक योगेश कोकाटे, कर्मचारी नंदकुमार गायकवाड,  संतोष नाईक, नवनाथ रासकर, अविनाश नाईक यांच्यासह सोमेश्वरचे माजी संचालक सिध्दार्थ गीते, ग्रूपचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय माळशिकारे, ॲड. नवनाथ भोसले, उद्योजक दीपक साखरे, नितीन सोरटे, पत्रकार महेश जगताप, युवराज खोमणे, नितीन यादव, अमर होळकर, शरद जगताप आदी उपस्थित होते.
To Top