सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव ता. बारामती येथिल किलबिल हाऊस प्ले स्कूलने आयोजित केलेले वार्षिक स्नेहसंमेलन येथिल राजे अमरसिंह कॉलनी गार्डनच्या'प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलित केल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात प्रथम गणपतीच्या वंदनेने झाली जणूकाही गणपती बाप्पाने साक्षात हजेरी लावली होती. असा देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला. शालेय गीतांबरोबरच विविध गाण्यांच्या तालावर मुले आनंदाने थिरकली व जोशाने नृत्य केले. छोट्या लहान मुलांच्या या कलागुणांचे पालकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. स्नेहसंमेलनात मुलांना व त्याचबरोबर पालकांना काही प्रेरणादायी अवॉर्ड देण्यात आले. ऑन टाईम कॉन्टेस्ट, स्पिरिट ऑफ द इयर, बेस्ट मदर ऑफ द इयर, बेस्ट टीचर ऑफ द इयर अशी अवॉर्ड देण्यात आली.
यामध्ये ऑन टाईम काँटेस्ट हा अवॉर्ड प्ले ग्रुप क्लासमध्ये कु.श्रीवर्धन ऋषिकेश गोफणे, नर्सरी क्लास मधील कुमारी शर्वरी राहुल चांदगुडे व कुमार शार्विल रंजित गोफणे तसेच एलकेजी क्लास मधील कु. शिवांश पोपट जगताप व कु. माही मधुकर वेळे व एचके जी क्लास मधील कुमारी दिव्यांशी गणेश कदम व कुमारी सानवी विनोद कदम या विद्यार्थ्यांना अवॉर्ड मिळाले व एचके जी क्लास मधील रिदांशी महेश कांबळे हिला 'स्पिरिट ऑफ द इयर' हा अवॉर्ड देण्यात आला व यानंतर श्रीमती योगिता रणजीत शिंदे यांना यावर्षीचा 'बेस्ट मदर ऑफ द इयर' हा अवॉर्ड देण्यात आला व शाळेतील शिक्षिका सौ सुचित्रा विनोद कदम यांना 'बेस्ट टीचर ऑफ द इयर' अवॉर्ड देण्यात आला, बक्षीस पात्र विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
----------------------