सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथे एका शेतात काम करणाऱ्या कामगाराचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला आहे.
सुनील वाबळे वय ५० मुढाळे ता बारामती असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाबळे हे गेली पंचवीस वर्षे कोऱ्हाळे येथील अरविंद खोमणे यांचेकडे शेतात कामगार म्हणून काम करत होते. दुपारी त्याचा मुलगा जेवणाचा डब्बा घेऊन शेतात आल्यावर त्याला आपल्या वडिलांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास सपोनि सचिन काळे करत आहेत.