सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील काश्मीर ते कन्याकुमारी ला जोडणाऱ्या मार्ग म्हणून मोरगाव- निरा हा रस्ता ओळखला जातो. सध्या रस्त्याचे दुरुस्ती काम सुरू आहे. गुळुंचे-कर्नलवाडी येथे खोद कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दि २३ ते २७ मार्च अशी पाच दिवसांची परवानगी असताना बेकायदेशीर ‘तीन’ दिवस ज्यादा काम करत संपूर्ण वाहतूक मार्ग बंद ठेवला आहे. असा बेकायदेशीर रस्ता बंद ठेवला जात असताना प्रशासन मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे.
यामुळे मार्गावरील प्रवास करणाऱ्या वाहनांची मोठी गैरसोय होत आहे. याप्रकरणी गंभीर दखल घ्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातून सातारा कडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून मोरगाव निरा येथून मोठ्या प्रमाणात दिवस रात्र वाहतूक सुरू असते. गेल्या अनेक दिवस रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड खड्डे व रस्त्यातील अडथळ्यांना सामोरे जावे लागते. रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या मानांकनाप्रमाणे दुरुस्तीचे निकष पाळले जात नाही . ठेकेदार मजुरी करत आहेत. का ? असा सवाल उपस्थित होतो.
मोरगाव येथील मुख्य चौकात रस्ता दुरुस्तीसाठी बंद असल्याचा भव्य फलक लावण्यात आला आहे. हा बोर्ड लावून सातारा, सांगली, कोल्हापूर, दिसेना जाणारी सर्व जेजुरी मार्गे निरा दिशेने वळविण्यात आली. यामध्ये नाहक अंतर वाढून प्रवासाचा त्रास सहन करावा लागला अशा तक्रारी मार्ग प्रवाशांनी केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. सलग तीन दिवस जादा व बेकायदेशीर परवानगी नसताना वाहतूक बदल केलेल्या ठेकेदाराविरुद्ध कुठल्या स्वरूपाची कारवाई होणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.