भोर ! संस्थानकालीन राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
३०० वर्षांची परंपरा असलेल्या पंतसचिवांच्या संस्थानकालीन श्रीराम जन्मोत्सव(राम नवमी) शहरातील राजवाडा येथे मोठ्या आनंदीमय वातावरणात तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांनी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला.
    श्री राम नवमी उत्सवाची सुरुवात चैत्र शुद्ध अष्टमीला अधिपतींच्या हस्ते पुण्य वाचनापासून होते.भोरच्या राजवाड्यात ३०० वर्षांपासून राम जन्मोत्सव पंतसचिव तसेच नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करतात.यंदा भोर शहराचे ग्रामदैवत जानाई देवीच्या काठी पालखीची मिरवणूक बुधवार दि.३० पारंपारिक वाद्य तसेच हत्ती ,उंट यांच्या उपस्थित काढण्यात आली.तर रामनवमी उत्सवानिमित्त गुरुवार दि.श्री श्रीराम मूर्तीची पालखीतून मिरवणूक, देव बसवणे ,पुष्पवाचन करून गीतरामायण झाल्यानंतर दुपारी १२ वाजता राजेश पंतसचिव,पार्थ व योगेश पंतसचिव यांच्या हस्ते श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.उपस्थित महिलांनी पारंपारिक पद्धतीने पाळणा म्हणून पुष्पवृष्टी करीत भोर  रामाच्या नावाचा जयघोष केला.दुपारनंतर भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे,माजी नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे,,माजी उपनगराध्यक्ष तानाजी तारू,माजी नगरसेवक जगदीश किरवे,यशवंत डाळ ,सर्कल पांडुरंग लहारे ,प्रमोद गुजर, प्रमोद भेलके तसेच हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
To Top