सोमेश्वर रिपोर्टर टीम------
साखरवाडी : प्रतिनिधी
माझ्या पाठीत खंजीर खुपसून कपट नितीनं माझ्याकडून साखरवाडीचा कारखाना काढून घेतला त्याच पद्धतीने मी तो शेवटच्या श्वासापर्यंत परत घेतल्याशिवाय राहणार नाही असे ठाम वक्तव्य फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केले.
माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या लोकसंपर्क मेळावा साखरवाडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात साळुंखे पाटील बोलत होते यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, तालुका भाजप चे अध्यक्ष बजरंग गावडे, नरसिंह निकम वकील,जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, सुशांत निंबाळकर, अशोक जाधव, साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, सरपंच सौ रेखा जाधव उपसरपंच अक्षय रुपनवर, भाजप महाआघाडीच्या सर्व महिला कार्यकर्त्या फलटण तालुक्यातील सर्व भाजपचे कार्यकर्ते पाटील या गटाचे सर्व कार्यकर्ते भाजपचे जेष्ठ नेते उत्तमराव भोसले व ग्रामस्थ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.