१ एप्रिल पासून दागिन्यांसाठी नवीन हॉलमार्क कायदा लागू होणार ! कायद्याचे स्वागतच पण सुविधा आणि त्रूटिंचा विचार होणे गरजेचे : राज्य समन्वयक किरण आळंदीकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
भारत सरकारने १ एप्रिल पासून ६ अंकी हॉलमार्क  युनिक आय. डी क्रमांक असलेले दागिणे विक्री करण्याचा सक्तीचा कायदा केला असून, ग्राहकांना शुद्ध सोने मिळावे,दागिणे खरेदी करताना फसवणूक होऊ नये या उद्देशाने या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. 
         या कायद्याचा हेतू चांगला असल्याने कायद्याचे स्वागत च आहे,याची सर्वांनीच अंमलबजावणी केली पाहिजे परंतु त्यातील त्रुटी अजून दूर झाल्या नसून, पुरेशा सुविधा अजून मिळत नाहीत,  भारत सरकारच्या व्यापार, उद्योग मंत्रालयाकडून अध्याप पर्यंत संपूर्ण स्पष्टीकरण नाही, तो पर्यंत हा कायदा लागू करण्याची घाई गडबड नको , या मुळे अनेक सराफ व्यवसायिकांमध्ये सध्या संभ्रमावस्था असल्याचे इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन चे राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांनी सांगितले.
काही व्यवसायिकांनी जुन्या पद्धतीने चार अंकी हॉलमार्क करून दागिणे विक्रीसाठी ठेवलेले आहेत, तो काढून नवीन ६ अंकी हॉलमार्क होणार का, असे असेल आणि पूर्वीचा दागिना हॉलमार्क असेल तर नवीन दागिन्यांवर पुन्हा फक्त युनिक आय. डी. क्रमांक साठी वेगळी फी कशासाठी हा प्रश्न अनुत्तरित आहे, संपूर्ण भारतात हा कायदा लागू होणार आहे, बऱ्याच ठिकाणी अजून हॉलमार्क सेंटरच नाहीत,त्यामुळे ज्या ठिकाणी हॉलमार्क सेंटर च नाहीत तेथील व्यवसायिकांनी दागिणे कुठून हॉलमार्क करायचे हा हि प्रश्न आहे, बी. आय. एस. च्या पोर्टल मध्ये सतत अडचणी येत असून बऱ्याच वेळा हे पोर्टल बंद अवस्थेत असते त्यामुळे दोन दोन दिवस दागिणे हॉलमार्क होत नाहीत, काही सेंटर्स चे नूतनीकरण करताना तांत्रिक बाबी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होत आहे, जुन्या पद्धतीचे हॉलमार्क केलेले दागिणे नवीन पद्धतीने करताना जबाबदारी दागिणे उत्पादकाची का दागिणे विक्रेत्याची याचे अजून स्पष्टीकरण नाही, या अशा अनेक बाबींचा विचार करता या साठी   भारत सरकारच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाकडून या कायद्याला मुदतवाढ मिळणे गरजेचे असल्याचे इंडिया बुलिअन & ज्वेलर्स असोसिएशन चे मत असल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले.
 --------------------
ग्राहकांमध्ये सध्या जुन्या दागिन्यांबद्दल संभ्रमावस्था असून नवीन हॉलमार्क पद्धत लागू झाली तरी जुने दागिणे विक्री करताना किंवा बदलताना कोणतीही अडचण येणार नाही किंवा त्याचे मूल्य कमी होणार नसल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले
मागील काळामध्ये संपूर्ण देशात 2 वेळा सोन्याच्या दागिन्यांवर वेगळे उत्पादन शुल्क केंद्र सरकारकडून लावण्यात आले होते, ग्राहकांवर याचा भुर्दंड पडणार असल्याने आणि कायद्यामध्ये जाचक तरतुदी असल्याने सराफ व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने मा.केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यांच्या मध्यस्थीमुळे  तोडगा निघाला होता,या वेळी देखील आपण शिष्टमंडळ घेऊन खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया ताई सुळे, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना भेटून निवेदन देणार असल्याचे आळंदीकर यांनी सांगितले.
To Top