बारामती ! 'सोमेश्वर' सर्व बाजूंनी सक्षम : आगामी हंगामात शेतकी विभागात सुधारणा करत १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याने या वर्षीच्या गाळप हंगामात आठ  हजार पेक्षा अधिक सरासरीने उसाचे गाळप केले आहे. सर्व बाजूंनी कारखाना सक्षम असून पुढील वर्षी १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून आतापासूनच ऊसतोडी यंत्रणेचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे मा. अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी व्यक्त केले.
         सोमेश्वरनगर ता. बारामती येथे सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी कोजन असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सोमेश्वर कारखाना अधिकारी वर्गाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात शिंदे बोलत होते. यावेळी संचालक सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, संग्राम सोरटे, सचिव कालिदास निकम, योगीराज नांदखिले, दीपक निंबाळकर, बापूराव गायकवाड, विराज निंबाळकर, राहुल नाझीरकर यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना संचालक सुनील भगत म्हणाले, कार्यकारी संचालक यादव यांनी क्लास वनची पोस्ट सोडून शेतकऱ्यांशी असलेली नाळ जपत साखर कारखान्यात काम करणे पसंत केले. कारखान्याचा हित पाहणारा कार्यकारी संचालक असेल तर निश्चितच कारखान्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. कार्यकारी संचालकला नेहमी कामगार व संचालक मंडळ यांच्यातला दुवा म्हणून काम करावे लागते. तर राजेंद्र यादव म्हणाले, जेंव्हा मी येथे ऊस विकास अधिकारी म्हणून काम करत होतो त्यापेक्षा सद्याची कार्यक्षेत्रातील सभासदांचे उंचावलेले राहणीमान पाहून अभिमान वाटतो, टूमदार घरे, रस्ते शैक्षणिक व्यवस्था पाहून सभासद स्वावलंबी झाल्याचे दिसते. त्याकाळी काही बोटांवर मोजण्याएवढे शेतकऱ्यांची चांगली शेती असायची आता ती परिस्थिती राहिली नाही. त्यातच उसाला देखील चांगला दर मिळत असल्याने उसातील गोडी वाढली आहे. हे सांगायला अभिमान वाटतो की सोमेश्वर कारखान्याची अधिकाऱ्यांची टीम मधील सर्वच सक्षम असून आपल्या कामात पारंगत व प्रामाणिक आहेत. सह्यादी साखर कारखाना माझ्या गावातला असून तिथे काम करण्याऐवजी की सोमेश्वर ला काम करणे पसंत केले. कारण माझी व माझ्या कुटुंबाची या या मातीशी, परिसराशी या लोकांशी नाळ जोडली गेली आहे. या मातीत प्रमाणिकपणाला व सत्याला न्याय मिळत असल्याचे सांगितले. 
             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे यांनी मानले.
To Top