सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर ( प्रतिनिधी )
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील बाबासाहेब गायकवाड संकुलात मंगळवारी मोफत हृदयविकार ,मधुमेह व संधिवात तपासणी शिबीर पार पडले .
बारामती चे मधुमेह ,संधिवात व हृदयविकार तज्ञ डॉ राहुल बबन जाधव व त्यांच्या पत्नी डॉ मोनाली जाधव यानी मोफत रक्तातील साखर तपासणे ,रक्तदाब व प्रत्येक रुग्णाचे हृदयाचा आलेख ई सी जी यावेळी काढणेत आला .
या अगोदर ही महिला दिनानिमित्त या हॉस्पीटल च्या वतीने महिलासाठी मोफत हिमोग्लोबीन व मधुमेह तपासणी सह अनेक तपासण्या मोफत करणेत आल्या होत्या .