सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भोर ता.भोर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील चार संस्था विसर्जन होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी दिली.
संस्था विसर्जनात घेऊन तीन ते पाच वर्षाचा कालावधी झालेला असून सदर संस्थेचे दप्तर विसर्जन अधिकारी यांना उपलब्ध होत नसल्याने कृषी सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित भोर ,काळुबाई पाणीपुरवठा संस्था मर्यादित वाठार, श्री छत्रपती सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित नाव्ही ,श्री गजानन सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित नाव्ही या अवसायनातील ४ संस्थांची नोंदणी रद्द होणार असून अंतिम सभा मंगळवार दि.२८ मार्चला कार्यालयात आयोजित केलेली आहे.