भोर ! संतोष म्हस्के ! अवकाळी पाऊस..पण नुकसान फक्त बळीराजाचचं....! भोर तालुक्यात शेतकऱ्याच्या तोंडातला घास अवकाळीने हिरावला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याला बुधवार दि.१५ अचानक अवकाळी पावसाने झोडपल्याने कापणी केलेली रब्बीची पिके भिजवून गेली असल्याने रब्बीतील पिके वाया जाणार असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला आहे.
      मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ हवामान तयार झाले होते.अवकाळी पाऊस कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता होती त्यातच बुधवार दि.१५ दुपारच्या वेळी पावसाने सुरुवात केली.यात रब्बीतील कापणी केलेली गहू,हरभरा,ज्वारी,करड ही पिके पावसात भिजून गेली आहेत.
To Top