सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : प्रतिनिधी
शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा शिरोळ नगरपरिषद प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली
शिरोळ नगर परिषदेकडील सन २०२२- २३ च्या आर्थिक वर्षातील ५%दिव्यांग अनुदानातून दिव्यांग लाभार्थ्यांना साडेपाच लाख रुपयाची तरतूद करण्यात आली होती सदरचे अनुदान वितरण नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते उपनगराध्यक्षा श्रीमती जयश्री धर्माधिकारी प्रभारी मुख्याधिकारी आशिष चौहाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील बोलत होते
प्रभारी मुख्याधिकारी आशिष चौहाण बोलताना म्हणाले की दिव्यांग बांधवांसाठी साडेपाच लाख रुपयाची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली होती त्याप्रमाणे शहरातील १९३ दिव्यांग बांधवांना ५% प्रमाणे अनुदान अपंगतत्वाच्या टक्केवारीनुसार देण्यात आले आहे यामध्ये ४०% पर्यंत अपंगत्व असलेल्या ५५ नागरिकांना १६७७ रुपये प्रमाणे ४१% ते ६०% अपंगत्व असणाऱ्या ६१ नागरिकांना२४३९ रुपये प्रमाणे तर ६१% ते ८०% अपंगत्व असणाऱ्या ४४ नागरिकांना३३२५ रुपये प्रमाणे व ८१% ते १००% अपंगत्व असणाऱ्या ३३ नागरिकांना ४९३० रुपये प्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे सदरचे अनुदान संबंधित १९३ दिव्यांग बांधवांच्या खात्यावर ऑनलाइन जमा करण्यात आले आहे असे सांगितले तसेच नगरपरिषदेच्या वतीने विविध योजनेचा लाभ देण्याचे अभिवचन त्यांनी दिले
यावेळी नगरसेवक राजेंद्र माने सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे आण्णासो पुजारी अमरसिंह शिंदे पत्रकार बाळासाहेब कांबळे चंद्रकांत भाट कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे लक्ष्मण लोंढे अश्विनी पाटील सीमा जाधव प्रभावती बाबर पोपट आदके शिरोळ शहर दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्यासह शहरातील दिव्यांग बांधव उपस्थित होते नगरसेवक तातोबा पाटील यांनी आभार मानले