बारामती ! सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आयोजित निर्भय कन्या अभियान कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील 70 मुलींनी सहभाग नोंदविला होता. 
           या कार्यशाळेमध्ये पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर तेजश्री अमोल जगताप या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदकुमार होळकर संस्थेचे चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.बा.सूर्यवंशी व उपप्राचार्य डी व्ही बनसोडे होते या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक पिंगळे एस. जी. व महाविद्यालयाचे ग्रंथपाल अजित जगताप यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक पिंगळे एच जी यांनी केले 
          डॉ. तेजश्री जगताप यांनी विद्यार्थिनींना आहार व्यायाम आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावयाची या विषयावर मार्गदर्शन केले  व विद्यार्थिनींना आहार आरोग्य बरोबरच करिअर व आहार आरोग्याचा समन्वय कसा साधावा यांचेही मार्गदर्शन केले दुसऱ्या सत्रामध्ये श्री अजित सोनवणे कराटे ब्लॅकबेल्ट डिग्री .निरा यांनी विद्यार्थिनींना योगासने आणि व्यायाम यांची दैनंदिन क्षेत्रात वावरत असताना उपयुक्तता कशी असावी याबद्दल माहिती दिली त्याचप्रमाणे त्यांच्याच दुसऱ्याचा सत्रात कराटे व संरक्षणासाठी लागणारा आत्मविश्वास निर्माण केला त्यानंतर काही प्रात्यक्षिके त्यांच्या शिष्या ऐश्वर्या पाद्ये व  निलोफर इनामदार यांच्या साह्याने करून घेतली तसेच शिक्षणासाठी व करियर साठी विदेशी किंवा दुसऱ्या शहरांमध्ये निर्भीडपणे राहण्यासाठी  संरक्षणाचा कसा उपयोग होईल याचे मार्गदर्शन केले अशा पद्धतीने दिवसभरात मुलींना एकूण दोन व्याख्याने व एक कराटे प्रशिक्षण देऊन कार्यक्रम संपन्न झाला तसेच मान्यवरांचे आभार प्रा. सौ भांडवलकर मॅडम यांनी मांनले या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित महाविद्यालयातील सर्व मुलींना अल्पोहार देऊन कार्यक्रम संपवण्यात आला. 
To Top