सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
दहावीच्या परिक्षा नुकत्याच संपल्या आहेत. आता दहावीनंतर करियरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याचा शोध विद्यार्थी घेत आहेत. यासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणारा विशेष कार्यक्रम बारामतीच्या आचार्य अॅकॅडमीमार्फत नीरा, ( ता. पुरंदर ) येथे आयोजित केला गेला आहे. नीरा येथील श्री लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे गुरुवारी दि. ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
दहावीनंतर करियरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. दहावीनंतर ११ वी आणि १२ या दोन वर्षांचे पुढच्या करियरसाठी असणारे महत्व, जेईई, नीट, एनडीए या प्रवेशपरिक्षांबाबत माहिती, आयआयटी - नीट परिक्षेची कार्यप्रणाली याबाबत या कार्यक्रमात माहिती दिली जाणार आहे.
आचार्य अॅकॅडमीचे संस्थापक प्रा. ज्ञानेश्वर मुटकुळे आणि शैक्षणिक समन्वयक प्रा. बापू काटकर हे विद्यार्थ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना या कार्यक्रमास उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.