जावली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत गुजर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे तर सचिव पदी धनंजय गोरे यांची निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-----
जावली :-प्रतिनिधी
जावली तालुका पत्रकार संघाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक कार्यकारणी निवडीच्या सभेत सर्वानुमते दैनिक सकाळचे सायगाव प्रतिनिधी प्रशांत गुजर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यासोबतच दैनिक तरुणभारतचे आनेवाडी प्रतिनिधी धनंजय गोरे यांची जावली तालुका पत्रकार संघाच्या  सचिवपदी  बिनविरोध फेरनिवड करण्यात आली

     जावली तालुक्यातील सर्वात जुना पत्रकार संघ म्हणून ओळख असणाऱ्या जावली तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारणीची निवड शशिकांत गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष म्हणून बामणोली विभागातील दैनिक पुढारीचे निलेश शिंदे  मेढा विभागातील दैनिक ग्रामोद्धार चे अभिजीत शिंगटे तर कार्याध्यक्षपदी दैनिक पुढारीचे भास्कर धनावडे खजिनदारपदी केळघर विभागातील दैनिक पुढारीचे रघुनाथ पार्टे व सहसचिवपदी मेढा विभागातील दैनिक लोकमतचे नंदू गाडगीळ त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार नारायण शिंगटे व सुरेश पार्टे यांनी काम पाहिले
     जावली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत गुजर म्हणाले सायगाव विभागात प्रथमच अध्यक्षपदाची संधी मिळाली असून येणाऱ्या काळात या संधीचा जावली तालुक्यातील पत्रकारांच्या आणि सर्व सामान्य जनतेच्या अडचणी सोडविणे या साठी प्रयत्न करणार असून जावली तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवून  तालुक्यातील आदर्श पत्रकार संघ म्हणून पुन्हा एकदा नावलौकिक मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत व्यक्त केले.मावळते अध्यक्ष शशिकांत गुरव म्हणाले मला मिळालेल्या कार्यकाळात जावली तालुका पत्रकार संघाचा  अध्यक्ष या नात्याने अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबविले  तसेच सहकारी पत्रकार बांधवांची अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले 
     या कार्यकारणी निवडी प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रवी गावडे सोमनाथ साखरे विजय सपकाळ संजय दळवी संदीप गाढवे नारायण जाधव सूर्यकांत पवार सूर्यकांत जोशी मोहन जगताप किशोर बोराटे सुहास भोसले विश्वनाथ डिगे प्रसन्न पवार बजरंग चौधरी सुनील धनावडे संजय वांगडे देवेंद्र साळुंखे, युवराज धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती जावली तालुका पत्रकार संघाच्या वतीने सचिव धनंजय गोरे यांनी सर्वांचे आभार मानले
To Top