सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर उपजिल्हा रुग्णालयाचे थकलेले वीजबिल वारंवार नोटिसा देवून गेले दीड वर्षांपासून थकल्यामुळे महावितरण भोर यांच्याकडून शुक्रवार दि.३ रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विजेअभावी रुग्णालयातील रुग्णांच्या इलेक्ट्रिक मशनरीद्वारे होणाऱ्या तपासण्या कोळंबल्या गेल्या तर येन उन्हाळ्यात पंखे बंद असल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले.
भोर उपजिल्हा रुग्णालयाची वीज बिल थकबाकी १० लाख ६२ हजार ७९० एवढी मागील दीड वर्षापासून राहिलेली असून रुग्णालयाचे अधिकारी वारंवार नोटिसा देऊनही याकडे दुर्लक्ष करीत होते परिणामी वरिष्ठांच्या आदेशानुसार वीज खंडित करण्यात आली असल्याचे उपकार्यकारी अभियंता महावितरण भोर संतोष चव्हाण यांनी सांगितले.तर शासनाकडे भोर उपजिल्हा रुग्णालयाला अनुदानसाठी वारंवार मागणी केलेली आहे.मात्र अनुदान आले नसल्याने वीज बिल थकलेले आहे .लवकरच अनुदान मिळाले की महावितरण कंपनीकडे थकीत विज बिल भरणा करणार असल्याचे भोर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.दोडके यांनी सांगितले.