सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
पुणे - पंढरपूर अरुंद पालखी महामार्गावर एसटी बस रस्ता सोडून खाली गेली. प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत लागलीच बस चालकाला बस चावलण्यापासून रोखले आणि लक्षात आले चालक मद्याधूंद अवस्थेत आहे. पुण्यात डिव्हायडरला धडक, जादा रेस, तर कधी नागमोडी बस चालली थोपटेवाडी फटा येथे डांबरी रस्ता सोडून साईडपट्टीवरून सुसाट वेगात चाललेली बस प्रवाशांनी बोंबाबोंब करुन रोखली.
मोहन इंगुळकर (रा. वेल्हा) व मंगल पाटोळे (रा. पंढरपूर) या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे स्वारगेट-सांगोला बस क्र. एम.एच-१४-बी.टी-३५८४ दुपारी १:३० वाजता निघालेली. स्वारगेट बस स्थानकाबाहेरच डीव्हायडरला धडकली होती. त्यानंतरही बस झोला मारत होती. कधी वेगात तर कधी रेस करत बसचा प्रवास सुरु होता. पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे गेट पासून तर बस नागमोडी चालू लागली. एक क्षणालातर समोरुन येणाऱ्या ट्रकला कट ही बसला, त्यानंतर बसने डांबरी रसता सोडून थेट साईडपट्टीवरून प्रवास सुरू केला. यामुळे प्रवाशी भयभीत झाले. आता प्रवाशांच्या लक्षात आले बहूतेक चालक दारु पिऊन बस चालवत आहे आणि तो अंदाज खरा ठरला. प्रसंगावधान दाखवत लागलीच प्रवाशांनी बोंबाबोंब केली. वाहकाने चालकाला बस थांबण्याची विनंती केली.
पुणे विभागाचे लाईन चेकर सहाय्यक वाहतूक निरिक्षक कमर शेख, वसंत रावते, रफिक आतार हे योगायोगानं नीरा परिसरातच होते. शेख यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली व चालकाला ताब्यात घेत नीरा पोलीसांत दिले. बस नीरा स्थानकात आणून प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. प्रवाशांनी चालका बाबत माध्यम प्रतिनिधींकडे तीव्र प्रतिक्रिया दिल्या.
सहाय्यक वाहतूक निरिक्षक कमर शेख यांनी दिलेल्या माहिती नुसार नियमित तपासणी करताना पालखी मार्गावर ५२ प्रवाशी घेऊन सांगोला आगाराची स्वारगेट सांगोला बस रस्त्याच्या खाली जाऊन थांबली होती. अशा अवस्थे बस का उभे आहे हे पाहिले असता, चालक संतोष विश्वंभर वाघमारे वय ३२ (रा. लातूर डेपो सांगोला) हा मद्याधूंद अवस्थेत आढळून आला. सोबत वाहक प्रविण बुरंजे (सांगोला डेपो) हे होते. प्रवाशंनी चालक दारू पिऊन बस चालवत असल्याची तक्रार केल्याने चालकाला ताब्यात घेत नीरा पोलीसांकडे दिले.