सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, वडूज, फलटण, लोणंद, वाई व जावली अशा नऊ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आजपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून दि. २० एप्रिल रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. २७ मार्च ते ३ एप्रिल अखेर बाजार समितीच्या निवडणूक कार्यालयात सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दि. ५ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारांच्या अर्जाची छाननी तर सहा ते वीस एप्रिल अखेर सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २१ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांच वाटप करण्यात येणार आहे. रविवार ३० एप्रिल रोजी मतदान तर मतदान संपल्यानंतर लगेचच अर्ध्या तासात मतमोजणी सुरू होईल अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांनी दिलीय. दरम्यान बाजार समिती निवडणुकीच बिगुल वाजल्यानं तालुक्यातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात चांगलंच तापणार आहे. त्यामुळ सत्ता संघर्षाच्या काळात बाजार समिती कोणत्या पक्षाकडे जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.