सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर साखर कारखान्याचे गाळप हंगाम सन २०२२~२३ ची सांगता समारोप करत असताना ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी या सर्व ऊस वाहतूक वाहनांमध्ये स्पर्धा लागते कि सर्वात जास्त ऊस वाहतूक कोण करेल यामध्ये ट्रॅक्टर ऊस वाहतूक मध्ये वाघळवाडी चे शेतकरी सभासद .जालिंदर बबनराव सावंत यांनी निव्वळ उसाचे वजन ४५.४११ टनेज वाहना सहित ५०.६५० टनेज वाहतूक करून सोमेश्वर कारखानाचा काटा लॉक केला.
गेली ७ ते ८ वर्षाची परंपरा कायम राखत यावर्षीही प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला. ऊस तोडणीदार मुकादम श्री.सिनाप्पा फुलमाळी यांनी योग्य पद्धतीने उसाचे रचना व ऊस भरणी केल्यामुळे व ट्रॅक्टर ड्रायव्हर.सचिन पाटोळे यांनी व्यवस्थितरित्या विना अपघात वाहन चालवल्यामुळे हे वाहतूक शक्य झाली. यावर्षीचा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष.पुरुषोत्तम जगताप, व्हा.चेअरमन प्रणिता खोमणे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, तसेच संचालक मंडळ, सभासद वर्ग, अधिकारी वर्ग, कामगार वर्ग यामधून स्वागत होत आहे
ग्रामपंचायत वाघळवाडी च्या वतीने सरपंच उपसरपंच, सदस्य, सर्व ग्रामस्थ हे आज वाहन मालक.जालिंदर बबनराव सावंत, मुकादम, ड्रायव्हर यांचा सत्कार करणार आहेत.
COMMENTS