सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम ता बारामती येथे सिद्धार्थनगर मध्ये दुर्गामाता मंदिराच्या बाजूला मटक्याच्या पावत्या फडात असल्याचे पोलीसांच्या निदर्शनात आल्याने त्याच्याकडील साहित्य जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शामराव भीमराव सोनवणे रा. मुरूम ता बारामती असे गुन्हा दाखल केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत सागर पांडुरंग देशमाने पोलीस नाईक यांनी फिर्यात दिली होती.
सदर छाप्यात लहान अकाराचे कागदाचे स्लिप बुके त्यावर आकडेमोड केलेली तसेच 2 कोरे स्लिप बुक, एक प्लास्टिकचा बाॅल पेन 2250 रोख रक्कम मिळून आले. सदरील आरोपी हा आपले कब्जात बेकायदा बिगरपरवाना कल्याण नावाचे मटक्याचे वर नमुद वर्णनाचे साहित्य व रोख असा एकुण 2255/- रू चा माल जवळ बाळगले स्थीतीत मिळुन आला आहे.
COMMENTS