भोर ! पुणे जिल्हा बँकेत खचाखच गर्दी : तालुक्यातील ११ शाखांमधून पीककर्ज भरणा करण्यासाठी शेतकरी बँकेत

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ११ शाखा असून सर्व शाखांमध्ये ७५ विकास सोसायटीच्या माध्यमातून घेतलेले रब्बीचे पीक कर्ज ३१ मार्च भरण्याची शेवटची तारीख असल्याने बँकांमध्ये कर्ज भरणाऱ्यांची खचाखच गर्दी झाली असल्याचे चित्र आहे.
    मागील आठवड्यापासून तालुक्यातील सर्व शाखांमध्ये २५ ते ३० हजार शेतकरी खातेदारांनी खरिपातील घेतलेले कर्ज पुन्हाफेड करण्यासाठी धावपळ सुरू आहे.अनेक जण उसने- पासने पैसे घेऊन तर बहुतांशी शेतकरी वर्षभरात पिकवलेल्या अन्नधान्य विकून त्याच्यातून मिळालेल्या पैशातून कर्जफेड करताना दिसत आहेत.कर्ज भरना करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून तसेच विकास सोसायटीच्या सचिवांकडून योग्य ती मदत केली जात असल्याने तर जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सोयी सुविधा नियुक्त असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
To Top