मराठी पत्रकार परिषदेतर्फे ७ एप्रिलला कर्जत येथे पत्रकारांचा राज्यस्तरीय मेळावा : ज्येष्ठ संपादक खा.संजय राऊत प्रमुख पाहुणे, आमदार रोहित पवार स्वागताध्यक्ष

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
अहमदनगर : प्रतिनिधी 
मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा ७ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.  कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आज येथे  पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहनही देशमुख यांनी केले 

यासंबंधी अधिक माहिती देताना एस. एम. देशमुख यांनी सांगितले की, ''मराठी पत्रकार परिषदेचा राज्यातील तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय मेळावा कर्जत (जि. अहमदनगर) येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या अद्ययावत शारदाबाई पवार सभागृहात दुपारी ११ वाजता होणार आहे. मेळाव्यासाठी राज्यभरातील सर्व तालुक्यांतील मिळून सुमारे आठशे पत्रकार उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.. या मेळाव्याची कर्जत-जामखेडमधील नियोजन समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुका आणि जिल्हा संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर करण्यात आला असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले..
एस.एम देशमुख यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना स्पष्ट, सडेतोड उत्तरं दिली.. पत्रकारांवरील वाढते, हल्ले, पत्रकार पेन्शन योजना, पत्रकार आरोग्य योजना, अधिस्वीकृती समित्या यासारखे विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्यानं पाठपुरावा केला जात असला तरी पत्रकारांच्या प्रश्नांसंबंधी सरकारची नकारात्मक भूमिका असल्याने हे सारे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.. कर्जत मेळाव्यात या प्रश्नांवर व्यापक चर्चा होऊन त्याबाबत ठोस भूमिका घेतली जाणार आहे.. डिजिटल मिडिया साठी लवकरच एक प्रशिक्षण शिबिर पुण्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.. 

कर्जतमधील पत्रकार गणेश जेवरे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेडचे पत्रकार अविनाश बोधले, सुदाम वराट, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद यांच्यासह सर्व स्थानिक पत्रकार तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत. मेळाव्यास परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह राज्यभरातील साधारण आठशेपेक्षा अधिक पत्रकार उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.. तशी तयारी केली जात आहे.. 

आजच्या पत्रकार परिषदेला राज्य सरचिटणीस हाजी मन्सूरभाई शेख, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषशेठ गुंदेचा, ‘लोकआवाज’ चे संपादक विठ्ठल लांडगे आदी उपस्थित होते.
 परिषदेचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी प्रास्ताविक केले. आफताब शेख यांनी आभार मानले.
कर्जत येथील  मेळाव्याला तालुका, जिल्हाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  सरचिटणीस मन्सुरभाई शेख, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांच्यासह संघटनेच्या राज्य आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराचे यंदाचे मानकरी  तालुके पुढील प्रमाणे-
नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा, ल अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती, लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली,
नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव,
पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा
 पुणे,  
कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ,
 जिल्हा सांगली,
 औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद,
 कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड
रंगाआण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराचे मानकरी
रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी
To Top