सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरुम (ता. बारामती) येथे श्रीमंत शिवगर्जना मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.या शिबिरामध्ये १७० नागरीकांचे मोफत डोळे तपासणी करण्यात आली. तसेच ५० रुग्णांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू तपासणीत ४५ रुग्णांवर बुधराणी हॉस्पिटल येथे मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष राहुल वाबळे, माजी सभापती निता फरांदे, सरपंच संजय शिंगटे, ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे अध्यक्ष संदीप चव्हाण, शिवगर्जना मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आदी यावेळी उपस्थित होते. बुधरानी हॉस्पिटलच्या वतीने बारामतीच्या पश्चिम भागात वारंवार मोफत शिबिरे पार पडत आहेत यातून सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.