सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
सासवड ता. पुरंदर येथिल मराठी साहित्य संशोधन परिषद व जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांनी आयोजित केलेल्या संमेलनात वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील सकाळ वर्तमानपत्राचे पत्रकार चिंतामणी क्षीरसागर यांना छत्रपती संभाजी महाराज आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
पत्रकारिता, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असताना समाजातील वेगवेगळ्या समस्या वृत्तपत्रात मांडून वाचा फोडण्याचे काम करून ग्रामीण भागात पत्रकारिता रुजवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पत्रकारिता पुरस्कार यावर्षी क्षीरसागर यांना देण्यात आला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष इतिहास अभ्यासक डॉ. बालाजी जाधव, संमेलनाचे उद् घाटक स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे १४ वे वंशज राजेंद्र बाजी मोहिते संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत पाटणे, निमंत्रक सुनील धिवार, सचिन भोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते, संमेलनाचे मुख्य संयोजक दशरथ यादव उपस्थित होते.
-------------------------------