बारामती ! तू मला भेट...काहीतरी वेगळं करू....सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगाराच्या मुलाला दिगदर्शक नागराज मंजुळेची थेट ऑफर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगाराचा मुलगा कार्तिक लोखंडे याला प्रसिध्द कवी व दिग्दर्शक नागराज मंजुळेनी यांनी तू मला भेट....वेगळं काहीतरी करू अशा शब्दात थेट ऑफर दिली आहे.
           बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्यावर 'जीवनकोंडी' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, जेष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, शिवाजीराजे निंबाळकर, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच ऊसतोडणी कामगार उपस्थित होते. बीड जिल्हयातील डोंगरगण येथील कार्तिक लोखंडे चे वडील गौतम लोखंडे हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर गेली १९ वर्ष उसतोड मजुर म्हणुन काम करतात.  कार्तिक ची आई आणि वडिल दोघेही उसतोडण्याचे काम करतात.
        सोमेश्वर कारखाण्याच्या शाळेच्या शेजारील कोप्यामध्ये हातावरती एक सहा वर्षाचा मुलगा उड्या मारणारतांना हातावर चालतांना कोरीओग्राफर योगेश ननवरे यांनी पाहिला. आणि सुरू झाला त्याचा डान्स महाराष्ट्र डान्स चा प्रवास सुरु झाला 2023 ला झी मराठीवर डान्स महाराष्ट्र डान्स लीटील मास्टरया शोचे आॅफलाईन  आॅडिशन मोबाईल वर आॅडिशन आले .आणि  त्याची तयारी करुन व्हिडीओ पाठ‌वुन आॅडिशन दिले. महाराष्ट्रातुन कार्तिक पन्नास हजार मुलांमधून सिलेक्ट झाला. नंतर पुढे मुंबई मध्ये शंभर मध्ये सिलेक्ट झाला.आणि त्यातुन फायनल आडिशनमध्ये टाॅप 12 मध्ये सिलेक्ट झाला. 
            या कार्यक्रमात बोलताना नागराज मंजुळे यांनी
कार्तिक, आपण कायतरी कारभार करू ..ऊसतोड मजुराचा कार्तिक लोखंडे हा नृत्याच्या कार्यक्रमात टिव्हीवर अंतिम फेरीपर्यंत पोचला होता. त्याचा सत्कार केल्यावर नागराज मंजुळे यांनी, तू मला भेट. मला खूप भारी वाटलं की तू नाचतोय. अडचणीत, उदास परिस्थितीत नाचणं हे जिद्दीचं लक्षण आहे. हे सतत व्हायला हवं. तसेच नागराजने मी दहावीत नापास झालो होतो असं सांगितल्यावर एका मजुराने 'खरं का?' असा प्रश्न विचारताच 'फेसबुकवर मी मार्कलिस्ट टाकलंय. आत्महत्येकडे वळणाऱ्या पोरांसाठी.' असं मंजुळे म्हणाले. त्याचे कौतूक करत तू मला भेट काहीतरी वेगळं करू अशी थेट ऑफरच दिली.
To Top