सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना आरोग्य, शिक्षणाबरोबरच मजुरांना आरोग्य विभागाच्या सहकार्याने अनेक वर्षे सलगपणे शिबिराचे आयोजन करत आहोत तसेच ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा प्रकल्प माध्यमातून अभ्यासवर्ग चालविणारा 'सोमेश्वर' हा राज्यातील पहिला कारखाना आहे. असे प्रतिपादन सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी केले. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व सोमेश्वर सहकारी
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड मजुरांसाठी सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात सुमारे तीनशे रुगणांची तपासण्या व उपचार करण्यात आल्या.
याप्रसंगी उपाध्यक्षा प्रणिता होळकर, संचालक शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे, रणजित मोरे, तुषार माहूरकर, वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड उपस्थित होते.
जगताप यांनी, मजुरांच्या लहान मुलांना अंगणवाडी मार्फत आहार मिळवून देणे, नजीकच्या शाळेत दाखल करणे, स्तनदा व गर्भवती मातांना आरोग्य विभागाच्या योजना मिळवून देणे ही कामे केली जातात.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी, ऊसतोडणी मजूरांमध्ये त्वचेचे आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाण जास्त आढळते. महिलांनी आहाराकडे लक्ष देऊन हिमोग्लोबीनचे प्रमाण चांगले राखल्यास उलट जास्त काम करू शकतील, असे आवाहन करत आरोग्याचे सल्ले दिले.
दरम्यान शिबिरामध्ये ह्रदयरोग, मधुमेह, नेत्र, त्वचा, बालरोग, स्त्री-रोग. मेडीसीन अशा विविध तज्ञ डॉक्टरांनी सुमारे तीनशे रूग्णांची तपासणी करून मोफत उपचारही केले. साई सेवा मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाकडून मोफत ईसीजीची सोय करण्यात आली होती. डॉ. विद्यानंद भिलारे, डॉ. तात्यासाहेब कोकरे, डॉ. राहुल शिंगटे, डॉ. विद्या नाझीरकर, डॉ. आर. डी. मदने, डॉ. श्रीमंत पाटील, डॉ. कर्णवीर शिंदे यांनी तपासणीचे काम केले. 'कोपीवरची शाळा' प्रकल्पाचे समन्वयक संतोष शेंडकर, परवेज मुलाणी, शिवाजी चव्हाण, योगीता माळी, कुसुम शिंदे आदींनी शिबिराचे आयोजन केले. नौशाद बागवान यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल कर्चे यांनी आभार मानले.