सुपे परगणा ! शिवाजी सोसायटीचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा : संभाजी होळकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील सुपे येथील छत्रपती शिवाजी महाराज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा आदर्श इतर सोसायट्यांनी घेण्यासारखा असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे संचालक संभाजी होळकर यांनी केले. 
          या संस्थेच्या नविन बहूद्देशिय इमारतीच्या भुमिपुजन होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळे होळकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक मिलींद टांकसाळे होते. या संस्थेने थकबाकीदारांच्या कर्जाच्या व्याजात ३० टक्के सवलत दिली. त्यामुळे थबाकीदारांकडुन ९० लाखाचा वसुल झाला. असा ऐतिहासिक निर्णय जिल्ह्यातच नव्हे तर महारष्ट्रातही कोणत्या संस्थेने घेतला नव्हता. मात्र या निर्णयामुळे संस्थेची वसुली झाली. तसेच सभासदांना ८ ते १० लाखाचा फायदा झाला. संस्थेची आत्तापर्यंत ६३ टक्के वसुली झाली आहे. मागिलवर्षी सर्व संस्था तोट्यात होत्या, मात्र या संस्थेला दिड लाखाचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय चांदगुडे यांनी दिली. 
       याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, माजी सभापती निता बारवकर, सरपंच स्वाती हिरवे, विशाल भोंडवे, राजेंद्र पानसरे, मनिषा चांदगुडे, माजी जि. प. सदस्य बापुराव चांदगुडे, बी. के. हिरवे, शौकत कोतवाल, संपतराव जगताप, सुभाष चांदगुडे, गणेश चांदगुडे, अतुल खैरे, संपतराव काटे, काका कुतवळ, दत्तात्रय कुतवळ, दत्तात्रय कदम, नितीन खैरे, सुशांत जगताप, मुनीर डफेदार, यादव कुदळे आदी उपस्थित होते. 
           या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जालींदर चांदगुडे यांनी केले. संख्येचे उपाध्यक्ष नारायण कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे सचिव लक्ष्मण चव्हाण यांनी आभार मानले. 
                 ...............................

To Top