भोर ! संतोष म्हस्के ! गुरुजी संपावर.....अनं मुलं सुट्टीवर....भोरला २८४ शाळांमधील ७०० शिक्षक बेमुदत संपावर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
 १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त राज्य सरकारी शिक्षकांसह सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी भोर तालुक्यातील २८४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ७०० शिक्षक बेमुदत संपावर गेले असल्याने विद्यार्थ्यांना अचानक सुट्टी मिळाली.
           भोर पंचायत समिती समोर तालुक्यातील बहुतांशी शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना लागू करा असे म्हणीत संपात सामील होत घोषणाबाजी करत आंदोलन केले.यावेळी शेकडोहून अधिक शिक्षक उपस्थित होते.

To Top