पुरंदर ! वाल्ह्यात रेल्वे रूळाजवळ एकाचा मृतदेह आढळला : आत्महत्या की अपघात

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
पुणे - मिरज रेल्वे मार्गावरील वाल्हे येथे रेल्वे रुळालगत एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. मंगळवारी सकाळी हा मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांना दिसला असून, रात्री रेल्वेची धडक किंवा धावत्या गाडीतून पडून हा व्यक्ती मृत पावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे का अपघात या बाबत उलटसुलट चर्चा वाल्हे नीरा परिसरात आहे. 
            रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी महर्षी वाल्मिकी विद्यालया समोरील रस्त्याच्या पलिकडील रेल्वे रुळालगत एक ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या अंगावर पांढरा शर्ट, पायजामा, गांधी टोपी, गळ्यात लाल गोप असा पेहरावा आहे. ही आत्महत्या आहे किंवा अपघात हे पोलीस शोधत असुन, परिसरातील कोणाच्य परिवारातील व्यक्ती घर सोडून गेली असल्यास त्यांनी जेजुरी पोलीसांशी संपर्क करण्याचे आव्हान नीरा रेल्वे पोलीस कँन्सटेबल मणिष निरमळ यांनी केले आहे. 
To Top