सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी बारामती तालुक्यातील १० प्राथमिक आरोग्य केंद्र व ५२ उपकेंद्रातील २३७ आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. याबाबत बारामती तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य तालुका अधिकारी डॉ मनोज खोमणे यांचेकडे निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होत असून महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त राज्य सरकारी, निमसरकारी इत्यादी सर्व कर्मचात्यांना /अधिकाऱ्यांना नवी पेंशन योजना NPS रदद करुन जूनी पेशन योजना (महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम १९८२ व नियम १९८४ ) पून्हा पुर्ववत लागू करावी या प्रमुख मागणी साठी दिनांक १४ मार्च २०२३ पासून पुकारण्यात आलेल्या राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जूनी पेशन संघटना, राज्य सरकारी ,निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या च्या बेमुदत संपात मी सहभागी होत आहे. १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संपाची रीतसर नोटीस संघटनेव्दारे राज्य शासनासस यापुर्वीच देण्यात आलेली आहे. तरी मी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होणार आहे.
COMMENTS