सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भूमिअभिलेख कार्यालय भोर येथे दलालांच्या मार्फत तालुक्यातील नागरिकांची मोठ्या रखमा घेऊन कामे केली जातात. यामुळे भोरचे भूमीअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनला आहे. दरम्यान अधिकारी नव्हे तर दलालांच्या माध्यमातूनच हे कार्यालय चालवले जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
बभोर शहरात असणाऱ्या भूमीअभिलेख कार्यालयात एजंट ( दलालांचा) सुळसुळाट वाढला असल्याने भूमीअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनला आहे.दलालांच्या माध्यमातूनच हे कार्यालय चालवले जात असून नागरिकांच्या कोणत्याही छोट्या-मोठ्या कामासाठी भरमसाठ रखमा मोजावे लागत आहेत याकडे कार्यालयातील अधिकारी दुर्लक्ष करीत असतात.या कार्यालयात येऊन दलाल की करणाऱ्या इसमांना लवकरच आस्थापनेमध्ये येण्यास मज्जाव करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष मोहिते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.