सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील आरोग्य संदेश बहुउद्देशीय प्रतिष्ठान व ज्योतिबा सावित्री विचार मंच आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन स्पर्धा 2022 रोजी घेण्यात आल्या होत्या. यामध्ये जय भवानी गड विकास प्रतिष्ठान विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्रेसिडेंट इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये लहान गट प्रथम क्रमांक. विराज तानाजी खाडे उत्तेजनार्थ . रिया शहाजी वाघमारे
मध्यम गटामध्ये प्रथम क्रमांक तनिष्का गणेश जाधव देशमुख मोठ्या गटामध्ये द्वितीय क्रमांक कु. सिद्धी नाना तनपुरे या विद्यार्थ्याने वकृत्व स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले.याचे बक्षीस वितरण इंदापूरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व डॉक्टर संदेश शहा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. चित्रलेका मॅडम सचिव हर्षवर्धन खाडे सल्लागार प्रदीप जी गुरव सर गणेश पवार सर व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ. रेखा सूर्यवंशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.