सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामतीच्या मुर्टी- मोढवे येथील मूळ रहिवासी असलेला मयूर मोरे हा तरूण राष्ट्रीय छात्र संसद मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस दिल्ली येथे ही आंतरराष्ट्रीय परिषद सुरू आहे. यापूर्वी विविध देशात झालेल्या कार्यक्रमात यांना भारत देशाच्यावतीने ही संधी मिळाली आहे.
आज पासून दोन दिवस विज्ञान भवन नवी दिल्ली येथे 13 -14 मार्च 2023 रोजी हा भव्य कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने जगभरातून अनेक मान्यवर या राष्ट्रीय छात्र संसद परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होतील. भारतीय छात्र संसदचे युवा छात्र संसद आणि आंतररा्ट्रीय परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधी करणारे मयूर मोरे हा युवक बारामती तालुक्यातील मूळचा ‘मोढवे’ या गावातील आहे. संपूर्ण जगभरातून काही निवडकच विद्यार्थ्यांना ही संधी मिळत असते.
यापूर्वी इंडोनेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मयूर मोरे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेय. तसेच सौदी अरेबिया येथे झालेल्या Y 20 virtual summit येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. न्यूयॉर्क अमेरिका येथे होणाऱ्या आगामी २० २१ मार्च २०२३ रोजी United nation global future forume ya आंतररष्ट्रीय परिषदेमध्ये पुन्हा तोच भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याला मिळालेल्या संधीबद्दल परिसरातून अनेकांनी कौतुक केले.
येथील परिषद भारत सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालय तसेच शहर विकास मंत्रालय तसेच G20,Youth20 यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून जगभरातून निवडक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विविध विषयावर चर्चा होणार आहे
सामायिक भविष्य: मध्ये तरुण लोकशाही आणि शासन, पाणी सुरक्षा सुनिश्चित करणे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार वागणूक , शहरी प्रशासन नियोजन फ्रेमवर्क , उद्योग 4.0 नवोन्मेष आणि २१व्या शतकातील कौशल्ये डिजिटल उत्प्रेरक शहरी भविष्य , 'स्थानिक'चा फायदा घेत क्षमता आणि ओळख या विषयावर दोन दिवसीय युवा चर्चा विज्ञान भवन दिल्ली येथे पार पडणार आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातून मयूर मोरे प्रतिनिधित्व करणार आहे