जुबिलंट इंग्रेव्हिया कंपनी तर्फे आयोजित कम्युनिटी मीटला उत्स्फुर्त प्रतिसाद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी 
जुबिलंट इंग्रेव्हिया तर्फे आयोजित कम्युनिटी मीटला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमात जिल्हा औद्योगिक केंद्राचे सहसंचालक सदाशिव सुरवसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी निराचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे,निंबुतच्या सरपंच निर्मला काळे, उपसरपंच अमर काकडे, पंचायत सदस्य, व इतर मान्यवर नेते, पत्रकार बंधू आणि भगिनी यांसह अनेक नागरिक सहभागी झाले. जुबिलंट इंग्रेव्हिया कंपनीच्या कॉर्पोरेट अफेअर्स विभाग प्रमुख जी.के.रमण, निरा युनिट हेड सतीश भट यांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी निरा आणि निंबुत ग्रामस्थांसाठी हकदर्शक उपक्रम सुरू करण्यात आला. 
       कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. सुरूवातीला जुबिलंट इंग्रेव्हियाचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांनी उपस्थितांचे स्वागत करून जुबिलंट समूहाची माहिती दिली. त्यानंतर सीएसआर प्रमुख अजय ढगे यांनी सीएसआर, तर दीपक सोनटक्के यांनी मनुष्यबळ विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली. विकास बारोट यांनी जीएसटी, निशांत फड यांनी सुरक्षा आणि पर्यावरणाबाबत घेण्यात येणारी काळजी याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे सदाशिव सुरवसे आणि जी.के. रमण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
        याप्रसंगी सुरक्षा विषयक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तर सत्र पार पडले. यामध्ये कंपनीचे निरा युनिट हेड सतीश भट यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली यांनी केले.यासाठी सर्वांनी उपक्रमाचे कौतुक केले.
To Top