शिरोळ ! सन्मानामुळे महिलांनी केलेल्या आदर्श कार्याची पोचपावती मिळते : प्रदीप पाटील

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
शिरोळ : चंद्रकांत भाट 
विविध क्षेत्रात काम करीत असताना महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठीवला आहे अशा महिलांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर यावा आणि त्यांनी केलेल्या आदर्श कामाची पोहोचपावती मिळावी यासाठी शिरोळ रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीने गुणवंत आणि कर्तबगार महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला पाठबळ दिले आहे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे माजी असिस्टंट गव्हर्नर प्रदीप पाटील यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ व माने केअर डायग्नोस्टिक सेंटर जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिक शिरोळ येथे गुणवंत व कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप पाटील बोलत होते. या समारंभाचे अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसेनानी श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन बँकेचे माजी चेअरमन अरुण आलासे हे होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सत्कार सोहळ्यात सुरुवात झाली. त्यानंतर समारंभात उपस्थित असणाऱ्या सर्व मुलींच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.
 यानंतर एकच मुलगी असणारे दापत्य सौ व श्री नितीन शेट्टी सौ व श्री समीर खाडे;  आदर्श माता पुरस्कार प्राप्त श्रीमती सरस्वती साळुंखे;  आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त सौ सुरेखा संजय देवकारे ; राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त खेळाडू ऋतुजा नंदकुमार कुंभार; एम पी एस सी परीक्षेत उज्वल यश मिळवलेली असिस्टंट इंजिनिअर मानसी राजाराम खडके; शिवाजी विद्यापीठात बी ई सिव्हिल या विभागात चौथा क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अल्पना प्रल्हाद कुंभार; आपल्या वक्तृत्व शैलीने संपूर्ण राज्यात शिरोळ  शहराचा नावलौकिक करणाऱ्या प्रज्ञा माळकर व शांभवी माळकर यांचा शाल सन्मानचिन्ह व गुच्छ देऊन  मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.
या समारंभात प्रज्ञा माळकर हिने महिला दिनाच्या निमित्ताने थोर महिलांच्या कार्याची माहिती देत महिलांच्या कार्याची जबाबदारी व जाणीव आपल्या मनोगतमधून करून दिली तर शांभवी माळकर हिने ऑफलाइन शिक्षण व ऑनलाईन शिक्षण या संदर्भातले फायदे तोटे मनोगतातून मांडून उपस्थितांना आपल्या वक्तृत्व शैलीने मंत्रमुग्ध केले.
स्वागत व प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन बालरोग तज्ञ डॉ अतुल पाटील यांनी केले तर आभार रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष डॉ अरविंद माने यांनी मानले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सचिव संजय तुकाराम शिंदे ट्रेझरर तुकाराम पाटील सदस्य राहुल यादव प्रा काशिनाथ भोसले संजय रामचंद्र शिंदे चंद्रकांत भाट महेश माने विवेक फल्ले अमोल चव्हाण राहुल माने यांच्यासह सर्व सदस्य ऋषिकेश माने श्रीकांत माळकर सुरेश खडके प्रल्हाद कुंभार सागर खाडे बाबासाहेब काळे शिवाजीराव पाटील ; अमोल पाटील ; कस्तुरी महिला क्लबच्या चित्रालेखा पाटील ; तृप्ती पाटील ; गायत्री मुळीक ; विद्या कोळी ; मनीषा कुंभार ; वैदेही मुळीक ; अर्चना माने  यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
To Top