सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खंडाळा : प्रतिनिधी
कोल्हापूरहून परतणाऱ्या कारच्या अपघातात मायलेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
महामार्गावर असणाऱ्याअनधिकृत रित्या चहाच्या टपऱ्या व पान टपरीवर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची कारने धडक दिली. यामध्ये चार चाकी कार मधील ४जन गंभीर जखमी झाले असून ट्रक चालक घटना स्थळावरून फरार झाला आहे.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर हून पुण्याच्या दिशेला देवदर्शन करून घरी परतणाऱ्या कार ने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने कारमधील आई मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्का चुर झाल्याने गाडीतील दोन्ही मृतदेह क्रेन च्या मदतीने बाहेर काढावे लागले. सदर कार मध्ये एकूण सात जण होते, त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हायवे लगत असणाऱ्या काही अनाधिकृत चहा टपऱ्या यामुळे रस्त्यावर एक लेन्थ मध्ये गाड्या चहा पिण्यासाठी उभ्या असतात. यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे रस्त्यावर गाड्या पार्क करून चालक चहा पिण्यासाठी थांबत आहेत. यावर प्रशासनाने पाबंद आणला पाहिजे.