सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे-कर्नलवाडी येथील प्रस्तावित खडीक्रशर बाबत आता जिल्ह्यात रान पेटले असून, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात लक्ष घातले असून पुण्याच्या जिल्हाधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गुळुंचे-कर्नलवाडी येथील प्रस्तावित खडीक्रशन बाबत ग्रामस्थांचे गेली दिवसापासून उपोषण सुरू होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रात्री आठपर्यंत याबाबत कोणताही तोडगा निघाला नव्हता. रात्री साडेसात वाजता बारामती लोकसभा मतदरसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोष्णकर्त्यांची भेट घेत जिल्हाधिकाऱ्यांची भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उपोष्णस्थळी भेट दिली. शिवतारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचना असलेले पत्र पुणे जिल्हाधिकारी यांना दिल्याचे दाखवत आंदोलन स्थगित करण्याची विनंती उपोषणकर्त्यांना दिली. तरी ही प्रांतांचा व तहसिलदार यांचा प्रत्यक्ष पाहणी अहवालाचे वाचन होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण न सोडण्याची भुमिका उपोष्णकर्त्यांनी घेतली.
याच दरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, स्थानिक आमदार संजय जगताप यांचे पुणे जिल्हाधिकारी यांना खानपट्टा रद्द करावा अशी पत्रे प्रांताधिकारी कार्यालयात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र भाजपाचे सचिन लंबाते यांनी सादर केले. अखेर रात्री ०९:३० वाजता दौंड पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे व प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्याचा अहवालाचे वाचन केल्यानंतर उपोषणकर्त्यांचे समाधान झाले. यानंतर माजी राज्य मंत्री विजय शिवतारे, पुणू जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबळ दुर्गाडे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, भाजपाचे सचिन लंबाते, शिवसेना उध्व ठाकरेचे अभिजित जगताप, कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव गणेश जगताप, माजी सभापती अतूल म्हस्के, राजेश दळवी, शेतकरी संघटनेचे दिलिप गिरमे व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निंबू सरबत पाजून १७ उपोषणकर्त्यांनी खडिमशीन विरोधाती अमरण उपोषण तीसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता सोडले. या वेळी बोलाईमातेच्या घोषणा देऊन परिसर गजबजून गेला.
COMMENTS