सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधक संघर्ष परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवीत काँग्रेसच्या राजगड कृषी विकास पॅनलने १८ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता प्राप्त केली.
बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी काँग्रेसच्या चार जागा बिनविरोध झाल्या होत्या.तर १४ जागांसाठी काँग्रेसचा राजगड कृषी विकास पॅनल व राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा,शिवसेना,ठाकरे गटाकडून संघर्ष परिवर्तन पॅनल समोरासमोर निवडणुकीसाठी रिंगणात उभे होते.शुक्रवार दि.२८ मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या विकास कामावर विश्वास ठेवून वज्रमूठ करून भरभरून मतदान केल्याने बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता कायम राखत विजय मिळवला.