बारामती ! शितल मगर यांची कृषी पर्यवेक्षकपदी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील शितल विलास मगर - जाधव  यांची नुकतीच कृषी पर्यवेक्षकपदी पदोन्नती झाली आहे. 
        मगर या दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथे कृषी सहाय्यक पदावर काम करीत आहेत. शासनाच्यावतीने सन २०२३ मध्ये कृषी पर्यवेक्षक या पदासाठी विभागिय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासन कृषी विभागाने आयबीपीएस या संस्थेमार्फत परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेत मगर यांनी भरघोष गुण मिळवुन यश संपादन केले. त्यामुळे त्यांची कृषी पर्यवेक्षकपदी पदोन्नती झाली आहे. मगर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तर दौंड तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक आदींनी अभिनंदन केले.  
             ...............................
To Top