सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
पाडेगाव येथील कॅनाॅलच्या पुलावरून मोटारसायकलवरील दोन तरूण सुमारे पन्नास फुट खाली सरदेच्या ओढ्यात कोसळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आहे.
या भीषण अपघातात मोटारसायकलवरील निखिल दणाणे रा. पाडेगाव हा जागीच ठार झाला असून शुभांकर बगाडे, सरडे ,फलटण मोटारसायकलवर हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लोणंद येथील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.