सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
शिरोळ : प्रतिनिधी
येथील बाल शिवाजी मंडळाच्या कबड्डी संघाने विविध ठिकाणी झालेल्या वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून आपल्या मंडळाचा व शिरोळ शहराचा नावलौकिक केला आहे
गेल्या महिन्याभरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या या कबड्डी स्पर्धेत शिरोळमधील बाल शिवाजी मंडळाच्या कबड्डी संघाने सहभाग घेऊन अनेक ठिकाणी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून आपल्या मंडळाचे व शिरोळ शहराचे नाव मोठे केले आहे सांगली जिल्ह्यातील सांगलवाडी येथे झालेल्या 70 किलो खालील कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे झालेल्या 70 किलो खालील वजनी गटात तृतीय क्रमांक सांगली जिल्ह्यातील मिरज येथे झालेल्या 70 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक तर सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक कृष्णाघाट मिरज येथील 65 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक कुपवाड येथे झालेल्या 70 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवून रोख रक्कम व चषक पारितोषिक म्हणून मिळवले आहे तसेच संघातील अनेक खेळाडूंची उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड खेळाडू म्हणून गौरविण्यात आले या कबड्डी संघात सौरभ इंगळे, तुषार पुजारी, कुणाल जगताप, बाळकृष्ण माने,शुभम माने,नरेश माने,अनुज भोसले,शिवराज ठोंबरे,अवधूत पाटोळे,प्रमोद माने गावडे,सुमित चुडमुगे,योगेश संकपाळ, इंद्रजित जगदाळे शुभम पाटील, अविनाश पोकळे, प्रथमेश पुजारी, सुसमित चौगुले या खेळाडूंचा सहभाग होता
या संघास बाल शिवाजी मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई उपाध्यक्ष अमरसिंह पाटील सचिव प्रा आण्णासाहेब माने गावडे प्रशिक्षक चंद्रकांत गावडे अमित उर्फ बंटी संकपाळ मार्गदर्शक खेळाडू संदीप चुडमुंगे,विश्वास चौगुले, नरेंद्र माने यांचे मार्गदर्शन लाभले विजयी संघातील सहभागी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे