सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १२ जागेसाठी जावली व महाबळेश्वर तालुक्यातुन एकूण ८४.३२ टक्के मतदान झाले असून सोसायटी मतदार संघासाठी ९३. ८६ टक्के, ग्रामपंचायत साठी ८०.२३ टक्के आणि आडते व व्यापारी मतदार संघासाठी ८०.८४ टक्के झाले आहे. २ हजार ३२२ पैकी १ हजार ९५८ मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावून २२ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये सिलबंद केले आहे. कुडाळ येथिल किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी ८ वाजलेपासुन मतदानास शांततेत सुरुवात झाली. जावली तालुक्यातील मेढा ( २ ), कुडाळ ( ३ ) तर महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर ( ३), तापोळा ( २ ) आणि कुंभरोशी ( १ ) अशा ११ केंद्रावर मतदान घेण्यात आले. क्षेत्रीय अधिकार्यां सह ७१ कर्मचार्यांनी मतदान केंद्रावर काम केले.
जावली व महाबळेश्वर तालुक्यातील मतदान कृषी व पत बहुद्येशीय सेवा सह. संस्था मतदान केंद्रावरील आकडेवारी पुढील प्रमाणे मेढा केंद्रांमध्ये १४० पैकी १३१ ( ९३. ५७ टक्के ) , कुडाळ ३९९ पैकी ३८२ ( ९५.७४ टक्के ) महाबळेश्वर ७९ पैकी ७७ ( ९७. ४७ टक्के ), तापोळा ६६ पैकी ५२ ( ७८.७९ टक्के ) मतदारांनी मतदान केले.
जावली तालुक्यातील ग्राम पंचायत मतदान केंद्रावरील आकडेवारी पुढील प्रमाणे मेढा केंद्रांमध्ये ३६२ पैकी २९६ ( ८१. ७७ टक्के ) , कुडाळ ४१३ पैकी ३६८ ( ८९. १० टक्के ) तर महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर १८३ पैकी १७१ ( ९३. ४४ टक्के ), तापोळा २९२ पैकी १६९ ( ५७.८८ टक्के ) तर कुंभरोशी ८० पैकी १६९ ( ७८.७५ टक्के ) मतदारांनी मतदान केले. तसेच जावली तालुक्यातील आडते व व्यापारी मतदान केंद्रांवरील आकडेवारी पुढील प्रमाणे कुडाळ केंद्रामध्ये १९१ पैकी १५७ ( ८२. २० टक्के ) आणि महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर ११७ पैकी ९२ ( ७८.६३ टक्के ) मतदारांनी मतदान केले आहे.
मेढा येथे पंचायत समितीच्या बाबासाहेब आखाडकर सभाग्रहात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती निवडूक निर्णय अधिकारी नानासाहेब रूपवनवर यांनी दिली.
भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले , राष्ट्रवादीचे आ. शाशिकात शिंदे व आ. मकरंद पाटील
यांच्या युतीचे शेतकरी विकास पॅनल व शिव सेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, राष्ट्रवादीचें माजी जि.प सदस्य दीपक पवार यांचे महाविकास आघाडीच्या पॅनल मध्ये सरळ लढत झाली असून कोण जिंकणार यांचा निकाल आज लागणार आहे.
COMMENTS