पुरंदर ! नीरा बाजार समितीत भाजप-शिवसेना एन्ट्री करणार : जालिंदर कामठे ! तर भाजप-शिवसेनेला खातेच उघडू देणार नाही : डॉ. दिगंबर दुर्गाडे....भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमेकांना कडवे आव्हान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 पुरंदर : प्रतिनिधी
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप शिवसेना नक्की खाते खोलणार, ग्रामपंचायत व हमाल मतदार संघातून नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती एन्ट्री करणार असल्याचा पश्चिम महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी विश्वास व्यक्त केला तर; मार्केट कमिटीत खाते खोलून देणारच नाही, मार्केट कमिटीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहील असा विश्वास पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केला. 

    नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक आज शुक्रवारी होत आहे. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत मतदानाचा टक्का कमी होता मात्र दुपारी बारापर्यंत तो ६० टक्केच्या पुढे जात असल्याचे चित्र आहे.  सोसायटी मतदारसंघातून १ हजार ९१७ मतदार असून दुपारी बारा पर्यंत १ हजार ४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ग्रामपंचारत मतदार संघातून १ हजार ९२ मतदार असून दुपारी बारा पर्यंत ४२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर माथाडी मतदार संघात १२९ मतदार असून दुपारी बारापर्यंत ९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

यादरम्यान निराकेंद्रावरती पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष जालिंदर कामटे यांनी भेट दिली असता माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप शिवसेनेचे आरपीआयचे पाच संचालक एन्ट्री करणार असून तसा विश्वास आम्हाला आहे त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी नसून काटे की टक्कर होणार असल्याचे त्यांनी स्वतः केले त्यानंतर पिडीसीसी बँकेचे चेअरमन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनीही माध्यमांशी संवाद साधला असता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या विचाराचे सर्व चे सर्व संचालक मार्केट कमिटी वरती निर्वाह निर्विवादपणे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला तर विरोधी पक्षाचे एकही उमेदवार या ठिकाणी निवडून येणार नाही असे सांगितले तर सोसायटी मतदारसंघांमध्ये विरोधी गटाचे डिपॉझिट जप्त करण्याचे काम या निवडणुकीत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

To Top