बारामती ! पत्रकार मनोहर तावरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी 
मोरगाव ता. बारामती येथील पत्रकार मनोहर तावरे यांना अहमदनगर येथील अनंत बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील बोगस शिक्षण संस्था व शिक्षकांच्या बोगस मान्यता याबाबत एक वृत्त मालिका प्रसारित केली. यानंतर हिवाळी अधिवेशनात दखल घेऊन कारवाईचे ‘आदेश’ देण्यात आले. या संपूर्ण विषयाचा शोध घेऊन न्याय देण्यासाठी प्रयत्न केल्याने सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहीर केला आहे.
   पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेली 25 वर्ष हुन अधिक काळ विविध प्रसिद्ध माध्यम क्षेत्रात मनोहर तावरे यांनी काम केले आहे. समाजातील विविध दुर्लक्षित घटक तसेच शासकीय योजना व याची होणाऱ्या अंमलबजावणी असे यांचे लेखनातील विषय सार्वजनिक चर्चेत असतात. दौंड तालुक्यातील वासुंदे गावात सुरू असलेली बोगस शिक्षण संस्था यापैकीच एक आहे.
  
     नोकरीचे आमिष दाखवून संस्थेने अनेकांची फसवणूक केल्याचे आरोप होते. यादरम्यान शासनाच्या शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून संस्थेत काढलेल्या शिक्षकांच्या बोगस मान्यता बातम्यांच्या माध्यमातून जनतेसमोर आणले. शासनाचे नियम व निकष डाउनलोड या संस्थेतील संपूर्ण भ्रष्टाचार उघड केला. यानंतर शिक्षण खाते  जागे झाले व कारवाई करून चार शिक्षकांच्या मान्यता रद्द ठरवल्या आहेत.
    या प्रकरणी सुमारे दोन महिने पुरावे गोळा करणे तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी भेटी घेतल्या आहेत. दरम्यान हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्यासाठी लोकप्रतिनिधींना संपर्क साधला. व राज्य शिक्षण विभाग यांना ही बाब निदर्शनास आणली. या प्रकरणाचा छडा लागला
To Top